मांजरी – मांजरी बुद्रुक परिसरामध्ये ४० फुटी रोडला लागुन असणाऱ्या वनखात्याच्या जमिनीमध्ये मांजरी ग्रामपंचायतीने बेकायदेशीर पद्धतीने सुरू केलेल्या कचरा डेपोमुळे प्रचंड असे कचऱ्याचे ढीग दुर्गंधी, डास आणि माश्यांचा उपद्रव यामुळे ४० फुटी रोड व झेड कॉर्नर परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांचें आरोग्य धोक्यात आले आहे.
या कचरा समस्या विरोधात मांजराईनगर नागरी कृती समितीच्या वतीने राजेंद्र साळवे, अजित घुले व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषण व धरणे आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांनी भेट देऊन पाहणी केली व नागरिकांच्या अडचणी जाणुन घेतल्या.
मांजरी गावात ठीक ठिकाणी कचऱ्याचे संपूर्ण ढिग साचलेले असुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. तो ही कचरा त्वरित उचलला जावा ,ही समस्या अत्यंत गंभीर असुन या संदर्भात महानगरपालिकेच्या घन कचरा विभागाचे उपायुक्त
अजित देशमुख, सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर, आरोग्य प्रमुख मंगलदास माने यांच्याशी चर्चा केली व यामधुन वनखात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्वरित मार्ग काढण्यात यावा, अशी मागणी करण्यात आल्याचे सुरेश घुले यांनी सांगितले.