अवैध दारू, गुटख्याची राजरोसपणे विक्री

अवैध दारू आणि गुटखा विक्री राजरोसपणे सुरू असतानाही पोलीस आणि उत्पादन शुल्क खात्याचे कर्मचारी कारवाई करीत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. कारवाईचा बागलबुवा उभा करुन पुन्हा मात्र तेथे अवैध धंदे सुरुच राहतात. संबंधितांवर ठोस कार्यवाही होत नसल्याने त्यांची गावात दहशत वाढल्याचे दिसून येत आहे.

विविध गावांत ढाबे आणि हॉटेलमध्ये बेकायदा दारू विक्री सुरू आहे. अवैध धंद्याबाबत महिलांनी तक्रार करुनही कारवाई होत नसल्यामुळे अनेकांचे प्रपंच उघड्यावर आले आहेत. मंचर, अवसरी, घोडेगाव, एकलहरे, कळंब, डिंभे, शिनोली, पारगाव आणि भीमाशंकर साखर कारखाना परिसरात 15-20 ढाबे, हॉटेल आहेत. सदर परिसर बागायती असल्याने येथील नागरिक आर्थिक सक्षम असल्याने ढाब्यांवर पार्ट्या आणि वाढदिवस साजरे केले जातात. संबंधित ढाबे आणि हॉटेलमध्ये दारू विक्रीचा परवाना नसतानाही सर्रास दारू आणि गुटखा विक्री सुरू असते. याबाबत पोलिसांना माहिती असूनही कारवाई करीत नसल्याचे बोलले जात आहे. तसेच अवसरी बुद्रुक गावाच्या पूर्वेला एक ढाबा आहे. येथे दारू विक्री सर्रास सुरू सदर ढाबा रस्त्यालगत असल्याने दारू पिऊन वाहनचालक अचानक मुख्य रस्त्यावर येतात. त्यामुळे ढाब्याजवळ अनेक अपघात होऊन दारू पिणारे जखमी झाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.