व्हिएतनाममध्ये निर्वासितांकडून बांगलादेश दूतावासाचा बेकायदेशीर ताबा

हनोई (व्हिएतनाम) – व्हिएतनाममध्ये 27 निर्वासितांनी 2 जुलै रोजी बांगलादेशच्या दूतावासाच्या इमारतीचा बेकायदेशीर ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. अशी माहिती बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.

या बांगलादेशींना मानवी तस्करी करणाऱ्या टोळीने व्हिएतनामला नेण्याचे आमिष दाखवले होते. त्यांच्याबाबत बांगलादेश दूतावासाला समजल्यावर त्यांच्यासाठी बांगलादेशला परत जाणाऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली. हनोईमधून 11 बांगलादेशी या विमानातून परत ढाक्‍याला परतले. मात्र 27 जणांनी मायदेशी परत जाण्यास नकार दिला. परतीच्या प्रवासाचे भाडे सरकारने द्यावे, अशी मागणी हे लोक करायला लागले.

हे लोक बांगलादेशविरूद्ध सोशल मीडियावर टीका करायला लागले. जर त्यांच्या मागण्या मान्य न झाल्या तर ते हनोईमधील बांगलादेशचे सर्व दूतावास ताब्यात घेतील, अशी धमकी त्यांनी आता सोशल मीडियावरून द्यायला सुरुवात केली आहे. मात्र या लोकांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे देण्याची तरतूद बांगलादेश सरकारकडे नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.