कराड – अवैध बेकायदेशीर देशी व विदेशी दारू विक्री व वाहतुकीवर छापा टाकून दोन दुचाकी वाहनासह 84 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. कराड तालुक्यातील भुयाचीवाडी, शिवडे, ओंड, पाचवड फाटा, टाळगाव गावच्या हद्दीत बुधवारी रात्री ही कारवाई केली. यामध्ये 11 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी की, बुधवारी रात्री कराड तालुक्यातील भुयाचीवाडी, शिवडे, ओंड, पाचवड फाटा, टाळगाव गावच्या हद्दीत अवैध बेकायदेशीर देशी व विदेशी दारू विक्री व वाहतुक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दोन दुचाकी वाहनासह देशी दारू 78 लिटर, विदेशी दारू 12 ब. लि. व बिअर 9 लिटर असा मुद्देमाल हस्तगत केला.तर यातील 11 संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे.