पळसदेव- लॉकडाऊनमध्ये केवळ मेडिकल व जीवनावश्य वस्तूची दुकाने फक्त सुरू आहेत; मात्र दारूची दुकाने बंद असल्याने तळीरामाची दारूसाठी चांगलीच पंचायत झाली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मात्र पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल ढाबे, बंद करण्यात आले असले तरी अनेक ठिकाणी अवैधरित्या चोरून दारूची विक्री सुरू आहे
इंदापूर ते भिगवण दरम्यान अनेक ठिकाणी नेहमीच्या दरापेक्षा अधिक दराने दारूची विक्री जोरात सुरू आहे . त्यामुळे अधिक दराने का होईन तळीराम दारू खरेदी करून आपली तल्लफ भागवत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दारू मिळतच नाही हीच चोरून आणलीय घायची असेल तर घ्या नाहीतर जाऊद्या नका घेऊ दारू असे सांगून अवैधच व तेही अधिकच्या दारात दारूची विक्री होत आहे.
लॉकडाऊन आहे; मात्र पुणे सोलापूर रस्त्यावर अनेक ठिकाणी तळीराम दारू तरार्ट होवून सेवा रस्त्यावर पडलेले पाहावयास मिळत आहेत. मग या तळीरामांना नेमकी दारू कोठून मिळाली हा देखील मोठा प्रश्नच आहे. लॉकडाऊन काळात पोलीस प्रशासन इतर बंदोबस्तात व्यस्त असल्याचा चांगलाच फायदा दारू विक्रेते करून घेत आहेत. तरी या बाबत प्रशासने तातडीने लक्ष देऊन अवैद्य रित्या सुरु असलेली दारू विक्री बंद करावी अशी मागणी नागरिक करत आहेत