बोगदा परिसरात अवैध दारू विक्री जोमात

ड्राय डेला हाऊसफुल्ल
ड्राय डेला सातारा शहरातील वाईन शॉप बंद असतात. इतरत्र दारू मिळत नसल्याने बोगद्यातील दारू धंद्यावर देशी, विदेशी दारूची चढ्या दराने विक्री बिनधास्तपणे अवैधरित्या सुरू असते. त्यामुळे मद्यपी मोठ्या प्रमाणावर याठिकाणी दारू खरेदीसाठी गर्दी करत असतात. त्यामुळे ड्राय डेला बोगद्यातील अवैध दारूधंदे हाऊसफुल्ल असतात.

सातारा – बोगदा परिसरात गेल्या काही वर्षांपासून अवैध दारू विक्री बोकाळली आहे. पोलीस यंत्रणेकडून डोळ्यावर हात ठेवण्याची भूमिका घेतली जात असल्यामुळे बिनधास्तपणे अवैधरित्या दारू विक्री जोमात सुरू असल्याचे चित्र बोगदा परिसरात गेल्या काही दिवसांपासून पहायला मिळत आहे.

सातारा शहराच्या पश्‍चिमेकडील बोगदा परिसर हा शहरातील अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षांपासून या परिसरात अवैद्य दारू विक्री जोमात सुरू आहे. रस्त्याच्या कडेलाच पानटपऱ्या आणि घरांतून देशी, विदेशी दारू विक्री केली जात आहे. यावर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे दिवसेंदिवस अवैध दारू विक्री व्यवसाय बोकाळत चालला आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणारा कामगार वर्ग आणि युवक हे दारूच्या व्यसनात गुरफटत जावून अनेक संसार उघड्यावर पडत आहेत.

गणेशोत्सव, कास पठारावरील पर्यटनाचा हंगाम, सुट्टीचे दिवस, निवडणुका या काळात बोगद्यात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असतो. पोलिसांच्या डोळ्यासमोरच अवैध दारू विक्री सुरू असते. त्यामुळे वेळच्यावेळी वरपर्यंत हप्ते पोहचत असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. दरम्यान, अवैध दारू विक्री करणाऱ्यांची दहशत असल्याने कोणीही तक्रार करण्यास पुढाकार घेत नाही. पोलिसांनीच कठोर पावले उचलत अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.