रत्नागिरी – परदेशात संपर्कासाठी चालवले जाणारे बेकायदा कॉल सेंटरचा पर्दाफाश आज शुक्रवारी दहशदवाद विरोधी पथकासह शहर पोलीसांनी केला. या कॉल सेंटरचा मास्टर माईंड असलेल्या फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी याच्यासह मोबाईल शॉपी मालकाला या बप्रकरणात अटक करण्यात आली आहे.
‘हायस्पिड इंटरनेटद्वारे सिप ट्रंक सिस्टिम’ चा उपयोग करून कमी पैशात पारदेशात संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येतो. याचा वापर मुख्यत्वे दहशतवादी कृत्यासाठी करण्यात येतो. या कॉल सेंटरची माहिती मुंबई एटीएसला मिळाली. त्यांनी ही माहिती रत्नागिरी एटीएसला ती कळवली. त्यानंतर तातडीने सूत्रे हलवत कारवाइर करण्यात आली.
रत्नागिरीच्या आठवडे बाजारातील शंकेश्वर आर्केडमधील श्रीटेक मोबाईल ऍन्ड टेककॉम शॉप या मोबाईल व अन्य तत्सम साहीत्याची विक्री करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला. तेथे संगणकाचा व इंटरनेट द्वारे बेकायदा दुरसंचार सेवा पुरविणारे साहीत्य जप्त करण्यात आले.
दुकानाचे मालक अलंकार अरविंद विचारे (वय 38)यांच्यासह अन्य दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाची फिर्याद सहायक पोलीस निरीक्षक नितीन पुरळकर यांनी दिली आहे.