बेकायदेशीर कृत्ये; पुण्यात सुनावणी होणार

पुणे – “सिमी’ संघटनेवरील बंदीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) न्यायाधिकरणाचा पुण्यात तीन मे ते चार मेदरम्यान दोन दिवसांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत प्रस्तुत प्रकरणी सुनावणी होणार आहे. सिमी संघटनेवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. या सर्व याचिका एकत्रित करण्यात आल्या आहेत. या प्रकरणावर चौकशी करण्यासाठी न्यायाधिकरणच पुण्यात येणार्‌ आहेत. यामध्ये बाजू ऐकून घेतली जाणार आहे.

यासाठी न्यायाधीश मुक्‍ता गुप्ता या पुण्यात येणार आहेत. त्यांच्यासमवेत डिव्हिजनल सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद तसेच वरिष्ठ वकील आणि विशेष सरकारी समुपदेशक सचिन दत्ता हे देखील न्यायाधिकरणासोबत पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दोन दिवसांच्या कालावधीत सिमी संघटनेच्या बंदीबाबतच्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. तसेच यावेळी तपासी अधिकाऱ्यांच्या साक्षीही घेतल्या जाणार आहेत.

न्यायाधिकरणाच्या सुनावणीच्या कामकाजासाठी राज्य सरकारी अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाचे चौकशी अधिकारी मनोजकुमार सिंग आणि केंद्रीय गृहमंत्रालयाचे संशोधन अधिकारी हिरण्मय बिस्वास यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. ही सुनावणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणार आहे. ज्यांना “सिमी’ प्रकरणात आपले म्हणणे मांडायचे आहे. त्यांनी शपथपत्रासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दि. 3 मे आणि दि 4 मे या कालावधीत सकाळी 10 पासून, न्यायाधिकरणापुढे उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाचे चौकशी अधिकारी मनोजकुमार सिंग – (मोबाइल क्रमांक 09818463686), केंद्रीय गृहमंत्रालयाचे संशोधन अधिकारी हिरण्मय बिस्वास – (मोबाइल क्रमांक 09868288941) हे याबाबत समन्वय अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.