बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज “रेड’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातील तिच्या कामाची सर्वत्र स्तुती करण्यात आली होती. आता ती अनीस बज्मी यांच्या “पागलपंती’मध्ये झळकणार आहे. इलियाना ही सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असते. ती आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. तिने अनेक वेळा आपला पार्टनर निबोनसोबतचे फोटोही शेअर केले असून या फोटोंना चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो.
आता इलियानाने आपल्य इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला असून यात ती सिजलिंगमध्ये खूपच हॉट दिसत आहे. व्हाईट कलरच्या बिकीनीमध्ये इलियाना ही समुद्रकिनारी असल्याचे दिसते. या फोटोला अनेकांनी लाईक्स आणि कॉमेंट्स दिल्या आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी तिने ऍड्रयू निबोनच्या वाढदिवसानिमित्त एक रोमांटिक पोस्ट शेअर करत त्याला वाढदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास इलियाना मल्टीस्टार “पागलपंती’मध्ये झळणार आहे. यात अनिल कपूर, जॉन अब्राहम, अरशद वारसी, सौरभ शुक्ला आणि पुलकिम सम्राट आदी कलाकारांची फौज आहे.