नवी दिल्ली : कोलकाताचा प्रसिध्द क्लब मोहन बागान संघाने शनिवारी आय-लीग फुटबाॅल स्पर्धेतील सामन्यात चर्चिल ब्रदर्स संघाचा ३-० ने पराभव करत विजय नोंदविला.
FULL-TIME ⌛
A supreme performance in the 2⃣nd half takes @Mohun_Bagan 3⃣ points closer to the #HeroILeague 🏆 title 🤩
CB 0⃣-3⃣ MB#CBMB ⚔ #LeagueForAll 🤝 #IndianFootball ⚽ pic.twitter.com/AuqMzO0Dzc
— Hero I-League (@ILeagueOfficial) February 22, 2020
सामन्यात मोहन बागान संघाकडून ला लीगा आणि सेनेगलचा स्ट्राइकर पापा बाबाकार दियावाराने ६ व्या मिनिटाला पहिला, वी.पी.सुहेरने ५१ व्या मिनिटाला तर ताजिक कोमरोन तुर्सुनोवने ५८ व्या मिनिटाला तिसरा गोल केला.
मोहन बागानचा संघ १३ सामन्यातील ३२ गुणासह गुणतालिकेत दुस-या स्थानी आहे. तर, चर्चिल ब्रदर्सचा संघ १२ सामन्यातील १९ गुणासह तिस-या स्थानी आहे.