नवी दिल्ली : नेरोका एफसी संघाने शुक्रवारी आय-लीग फुटबाॅल स्पर्धेतील सामन्यात गोकुलम केरला एफसी संघाचा ३-२ ने पराभव करत विजय नोंदविला.
FULL-TIME ⌛
A vital 3⃣ points for relegation-battling 🤺 @NerocaFC, as they edge past @GokulamKeralaFC today 🤩
NFC 3⃣-2⃣ GKFC#NFCGKFC ⚔ #HeroILeague 🏆 #LeagueForAll 🤝 #IndianFootball ⚽ pic.twitter.com/ZlVMqpnz41
— Hero I-League (@ILeagueOfficial) February 21, 2020
नेरोका एफसी संघाकडून प्रीतम सिंगने सामन्याच्या दुस-याच मिनिटाला गोल करत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर शिबिल मुहम्मदने २५ व्या मिनिटाला गोल करत गोकुलम केरला एफसी संघास १-१ अशी बरोबरी साधून दिली.
81' GOOAAL! Jestin George mistimes a defensive header, as Ronald Singh makes use of the opportunity to put @NerocaFC in an early lead 😱
NFC 3⃣-2⃣ GKFC
💻: https://t.co/hKQzITYcRj#NFCGKFC ⚔ #HeroILeague 🏆 #LeagueForAll 🤝 #IndianFootball ⚽ pic.twitter.com/LmXzq4BD6x
— Hero I-League (@ILeagueOfficial) February 21, 2020
गोकुलमच्या नटानियल गार्सियाने ४० व्या मिनिटाला गोल करत संघास आघाडीवर नेले. पण, दुस-या सत्राच्या सुरूवातीला ४८ व्या मिनिटाला फिलिप एडजाहने गोल करत नेरोका एफसी संघाला २-२ ने बरोबरी साधून दिली. त्यानंतर नेरोका एफसीच्या रोनाल्ड सिंगने ८१ व्या मिनिटाला तिसरा व विजयी गोल केला.