#ILeague Football : ‘रियल काश्मीर’ संघाचा ‘आयजोल एफसी’वर विजय

नवी दिल्ली : कालम हिगिनबाथम आणि मासन राबर्टसन यांच्या गोलच्या जोरावर रियल काश्मीर संघाने शनिवारी झालेल्या आय लीग फुटबाॅल स्पर्धेतील सामन्यात गतविजेत्या आयजोल एफसी संघाचा २-० ने पराभव करत विजय मिळविला.

रियल काश्मीर संघाकडून कालम हिगिनबाथमने १७ व्या मिनिटाला पहिला तर मासन राबर्टसन याने ८२ व्या मिनिटाला दुसरा व निर्णायक गोल केला.  रियल काश्मीर संघाचा हा सलग दुसरा विजय ठरला.

रियल काश्मीर संघाचे ८ सामन्यात १२ गुण झाले असून गुणतालिकेत ते पाचव्या स्थानी पोहचले आहेत. दुसरीकडे आयझोल एफसी संघाचे ९ सामन्यात ८ गुण झाले असून गुणतालिकेत ते दहाव्या स्थानी आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.