चेन्नई : बाबा डिवरा याच्या दोन गोलच्या जोरावर ‘मोहन बागान’ संघाने शुक्रवारी झालेल्या आय लीग फुटबाॅल स्पर्धेतील सामन्यात ‘चेन्नई सिटी एफसी’ संघाचा ३-२ ने पराभव करत विजय संपादित केला.
FT: It was nothing less than an absolute thriller 🎬 in Coimbatore as @Mohun_Bagan clinch important 3️⃣ points against @ChennaiCityFC
CCFC 2️⃣-3️⃣ MB#HeroILeague 🏆 #IndianFootball ⚽ #LeagueForAll 🤝 #CCFCMB ⚔ pic.twitter.com/fLDAiJfquQ
— Hero I-League (@ILeagueOfficial) January 31, 2020
मोहन बागान संघाकडून बाबा डिवरा याने २८ व्या मिनिटाला आणि ४९ व्या मिनिटाला असे दोन गोल केले तर फ्रॅन गोंझालेसने २९ व्या मिनिटाला एक गोल केला.
चेन्नई सिटी एफसी संघाकडून उत्तरार्धात विजय एन याने ६५ व्या आणि जिश्नू बालाक्रिशन याने ६९ व्या मिनिटाला गोल केला.
या विजयासह मोहन बागान संघाचे १० सामन्यात २३ गुण झाले असून ते गुणतालिकेत अव्वलस्थानी आहेत. दुसरीकडे चेन्नई एफसी सिटी संघाचा हा ८ सामन्यात हा चौथा पराभव असून त्याचे ८ गुण आहेत. त्याचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे.