नवी दिल्ली : ईस्ट बंगाल संघाने पिछाडीनंतर पुनरागमन करत रविवारी आय-लीग फुटबाॅल स्पर्धेतील सामन्यात टीआरएयू एफसी संघाचा ४-२ ने पराभव करत विजय नोंदविला.
FULL-TIME ⌛
A late surge by @officialtraufc was not enough, as @eastbengalfc run away with a win by a ✌-goal margin 👏👏
TRAU 2⃣-4⃣ QEB#TRAUQEB ⚔ #HeroILeague 🏆 #LeagueForAll 🤝 #IndianFootball ⚽ pic.twitter.com/HIJgkHJek7
— Hero I-League (@ILeagueOfficial) February 23, 2020
टीआरएयू एफसी संघाकडून प्रिंसविल एमेकाने १८ व्या मिनिटाला गोल करत संघास १-० ने आघाडी मिळवून दिली होती. ही आघाडी सामन्याच्या मध्यांतरापर्यंत कायम होती. पण दुस-या सत्रात ईस्ट बंगालने जोरदार पुनरागमन केले.
दुस-या सत्रात ईस्ट बंगालच्या जेमी कालाडोने ५२ व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधून दिली. त्यानंतर संघाच्या कासिम एडाराने ६७ व्या मिनिटाला , ब्रेंडनने ६९ व्या मिनिटाला आणि मार्कोस एस्पाडाने ७६ व्या मिनिटाला गोल करत संघास ४-१ ने आघाडीवर नेले. टीआरएयूच्या पैट्रिक उचे ने ८५ व्या मिनिटाला गोल करत स्कोर ४-२ केला पण निर्धारित वेळेत हा स्कोर कायम राहिल्याने ईस्ट बंगालचा विजय झाला.