अध्यक्षपदी इक्रम खान तर, सचिवपदी हनिफ शेख

महाराष्ट्र हॉकी संघटनेची निवडणूक बिनविरोध

पुणे -महाराष्ट्र हॉकी संघटनेच्या (एमएचए) अध्यक्षपदी माजी राष्ट्रीय हॉकीपटू इक्रम खान यांची तर, सचिवपदी हनिफ शेख यांची निवड करण्यात आली. या निवडणुकीत संघटनेची नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.

गेल्या सहा वर्षांत पहिल्यांदाच निवडणूक घेऊन ही नवी कार्यकारिणी अस्तित्वात आली आहे. न्यायालयीन लढाईनंतर भारतीय हॉकी संघटनेची मान्यता रद्द होऊन हॉकी इंडिया ही संघटना अस्तित्वात आली. हॉकी इंडियाने महाराष्ट्रातील हॉकीची जबाबदारी घेण्यासाठी हॉकी महाराष्ट्रची नियुक्ती केली आहे. सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

करोनाचा धोका संपुष्टात आल्यावर मैदानावर प्रत्यक्ष खेळ सुरू करण्याआधी विविध राष्ट्रीय संघटनांकडून एमएचए प्रथमतः मान्यताप्राप्त करून घेणार आहे. राज्याच्या नवीन कार्यकारिणीची निवड होणे, ही फार महत्त्वाची गोष्ट असल्याचे खान यांनी स्पष्ट केले. राज्यातील हॉकीप्रेमींना एकत्र आणून या खेळाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आम्ही करणार आहोत.

संघटनेची नवी कार्यकारिणी – अध्यक्ष – इक्रम खान. उपाध्यक्ष – गुलाबराव पोळ, आझम पानसरे, जे. एस. कुचेकर, सतीश पवार. सचिव – हनिफ शेख. सह-सचिव – विजय पाटील. खजिनदार – चंद्रकांत सोळंखे. सह-खजिनदार – इस्माईल समडोळे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.