नवी दिल्ली : ‘जेईई-मेन्स’ आणि ‘नीट’ परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या असून ‘जेईई-मेन्स’ परीक्षा ही 18 ते 23 जुलै दरम्यान घेतली जाणार आहेत तर वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नीट’ परीक्षा 26 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने वेळापत्रकाची घोषणा केली.
‘जेईई-मेन्स’ आता 18, 20, 21, 22 आणि 23 जुलै या दिवशी होईल. जेईई अॅडव्हान्स परीक्षा ऑगस्ट महिन्यात होणार असून त्याची तारीख अद्याप निश्चित नाही.
IIT-JEE (Main) examination to be held on 18, 20, 21, 22, & 23 July. IIT-JEE Advance exam to held in August, date to be announced later. NEET exam to be held on 26th July: Ramesh Pokhriyal, Union Human Resource Development Minister pic.twitter.com/uG0P3FbD3b
— ANI (@ANI) May 5, 2020
“कोविड-19’चा प्रसार नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज (मंगळवार 5 मे) केलेल्या घोषणेमुळे लाखो उमेदवारांचा जीव भांड्यात पडला.
दरम्यान, “जेईई-मेन्स’ ही परीक्षा देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येते, तर वैद्यकीय महाविद्यालयांसाठी प्रवेशासाठी “एनईईटी’ (नीट) परीक्षा घेतली जाते. यावर्षी देशभरातील 15 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी “नीट’साठी नोंदणी केली आहे, तर जेईई मेन्ससाठी 9 लाखाहून अधिक युवकांनी नोंदणी केली आहे,