गुवाहाटी – गुवाहाटी आयआयटी संस्थेतील विद्यार्थ्यांनी हवेतून पाणी मिळवण्याचे एक संशोधन सुरू केले आहे. त्यांनी त्यासाठी हायड्रोफोबिसीटी तंत्रावर आधारीत एक नवीन तंत्र यासाठी शोधून काढले आहे. त्या संस्थेतील रसायन शास्त्रातील एक प्राध्यापक उत्तम मन्ना यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने हे तंत्र शोधून काढले आहे.
रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीच्या जर्नल मध्ये त्यांचे हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. धुकेयुक्त हवेतून पाणी बाजूला करण्याचे हे तंत्र आहे.
त्यासाठी ही हवा गार करण्याची गरज नाही. हे एक मुलभूत संशोधन मानले जात असून ते भविष्यात आणखी विकसिस केले जाऊ शकते असा या प्रयोगाशी संबंधीत व्यक्तींचा दावा आहे. रॉयल सोसायटीच्या जर्नल मध्ये या संशोधनाची सविस्तर तांत्रिक माहिती देण्यात आली आहे.