IIFA Awards 2024 – आयफा पुरस्कारांमध्ये अभिनता शाहरुख खानला जवान चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्तम अभिनेता आणि रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ऍनिमल या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. शनिवारी रात्री झालेल्या समारंभामध्ये या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे मधील भूमिकेसाठी राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला राणी मुखर्जीने हा पुरस्कार जगभरातल्या मातांना समर्पित केला. गायिका शिल्पा राव हिला जिने त्यांच्या देखील शाहरुपखच्या जवान चित्रपटातील चलेया या गीतासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला. तर चित्रपट निर्माते विधू विनोद चोप्रा यांना त्यांच्या १२वी फेल चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा आयफा पुरस्कार मिळाला.
संदीप रेड्डी वंगा यांच्या ऍनिमल चित्रपटातल्या भूमिकेसाठी अभिनेता अनिल कपूर आणि बॉबी देओल यांना देखील अनुक्रमे सर्वोत्कृष्ठ सहायक अभिनेत्याचा आणि नकारात्मक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
प्रीतम, विशाल मिश्रा, मनन भारद्वाज, श्रेयस पुराणिक, जानी, भूपिंदर बब्बल, आशिम केमसन, हर्षवर्धन रामेश्वर यांच्या संगीत दिग्दर्शनासाठी देखील ऍनिमलला पुरस्कारही मिळाले. याच चित्रपटातल्या अर्जन वैल्ली या गीतासाठी बब्बल यांना सर्वोत्कृष्ठ पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला.
रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटात मुख्य अभिनेत्री आलिया भट्टच्या आजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शबाना आझमी यांनी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा आयफा पुरस्कार मिळाला. तर लेखिका इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांना सर्वोत्कृष्ट कथेसाटीचा पुरस्कार मिळाला. भारतीय चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीसाठीचा विशेष उल्लेखनीय पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री-राजकीय नेत्या हेमा मालिनी यांना प्रदान करण्यात आला.