Shah Rukh-Madhuri Dance Video | अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित या दोघांना एकत्र काम करताना पाहणे चाहत्यांसाठी पर्वणीच असते. चित्रपट असो अथवा डान्स, या दोघांची जोडी आजही लोकप्रिय आहे. शाहरूख व माधुरीने दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे. 90च्या दशकात दोघांची जोडी खूप गाजली. आता हे दोघेही कलाकार या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळाले.
नुकताच जयपूरमध्ये आयफा पुरस्कार सोहळा 2025 पार पडला. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान करिना कपूर आणि शाहिद कपूरने एकमेकांना मिठी मारल्याचा व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर आता शाहरुख आणि माधुरीचा एकत्र गाण्यावर डान्स करतानाचा व्हीडिओ समोर आला आहे.
View this post on Instagram
आयफाने ‘सर्वात सुंदर जोडीचे रियुनियन’ असे लिहित शेअर केलेला हा व्हीडिओ व्हायरल होत आहे. तर माधुरी काळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. या व्हीडिओमध्ये बॅकग्राउंडमध्ये ‘तुम्हे जो मैने देखा’ या गाण्यावर दोघेजण थिरकताना दिसत आहे. मात्र, त्यांचे डान्स स्टेप्स पाहून वाटते की ते ‘दिल तो पागल है’ या चित्रपटाच्या गाण्यावर डान्स करत आहेत.
आयफाने शेअर केलेला हा सुंदर व्हीडिओ व्हायरल होत आहे. 90च्या दशकात विशेष गाजलेल्या या जोडीला एकत्र डान्स करताना पाहून चाहते देखील प्रचंड आनंदी झाले आहेत. नेटकरी या जोडीच्या डान्सचे कौतुक करत आहेत, तर काहीजण हा खूपच सुंदर क्षण असल्याचेही म्हणत आहेत.
दरम्यान, शाहरूख व माधुरीने ‘हम तुम्हारे है सनम’, ‘दिल तो पागल है’, ‘कोयला’, ‘देवदास’, ‘अंजाम’, सारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.