हृदयविकाराच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास होऊ शकतो पश्चाताप

हृदयविकार हा जगातला क्रमांक एकचा जीवघेणा विकार आहे

पुणे – हृदयाच्या धडधडण्यावरच शरीराचं कार्य अवलंबून असतं. म्हणूनच त्याची विशेष काळजी घ्यायला हवी. जगभरातच हृदयविकाराने मृत्यू होणार्‍यांची संख्या प्रचंड आहे. हृदयविकार हा जगातला क्रमांक एकचा जीवघेणा विकार आहे. बहुतांश वेळा लोक हृदय विकारांच्या सुरूवातीच्या संकेतांकडे दुर्लक्ष करतात. या दुर्लक्ष करण्यामुळे पुढे होणारा परिणाम अतिशय जीवघेणा ठरू शकतो.

हे आहेत “हार्ट अटॅक’ची लक्षणे –

१) छातीत वेदना होतात. हृदयावर दाब.

२) छातीपासून हातापर्यंत वेदना होणे ही वेदना शक्यतो डाव्या हाताला होते. परंतु कधीकधी दोन्ही हातांना असे होऊ शकते. ही वेदना तोंड, मान, पाठ आणि पोटाकडे जाते.

३) मन अशांत किंवा चक्कर येणे.

४) मोठ्याप्रमाणात घाम येणे.

५) श्वास घेण्यास त्रास होणे.

६) मळमळ, उलटीसारखे वाटणे.

७) अस्वस्थ वाटणे.

८) खोकल्याची उबळ, जोरजोरात श्वास घेणे.

९) हृदयविकाराचा झटका येताना सुरूवातीला वेदनांची तीव्रता बरीच कमी असते.

१०) महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याआधी छातीत दुखणं, अस्वस्थ वाटणं अशी लक्षणं जाणवू शकतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.