बेरोजगारीकडे झालेले दुर्लक्ष चिंताजनक : रघुराम राजन यांचे प्रतिपादन

नोटबंदीच्या निर्णयावर आत्मपरिक्षण करण्याचा दिला सल्ला

नवी दिल्ली – देशातील बेरोजगारीच्या प्रश्‍नाकडे साफ दुर्लक्ष झाले असून ही चिंताजनक बाब आहे असे रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे. नोटबंदी सारख्या अर्थकारणाला नुकसानकारक ठरलेल्या योजनांच्या संबंधात सरकारने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे असे प्रतिपादनही त्यांनी केले आहे.

एका दूरचित्रवाणीवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ते म्हणाले की आता भारताला थोडे मागे वळून पहावे लागणार आहे. नोटबंदी सारख्या निर्णयातून आपण नेमके काय शिकलो याचाही अभ्यास करावा लागेल असे ते म्हणाले. विधायक आणि नकारात्मक या दोन्ही परिणामांचा अभ्यास करावा लागणार असून अशा प्रकारच्या निर्णयातून आपल्या पदरात नेमके काय पडले हेही तपासावे लागेल असे ते म्हणाले.

बेरोजगारीच्या विषयावर झालेले दुर्लक्ष ही चिंताजनक बाब आहे असे सांगून ते म्हणाले की एनएसएसओ ने या संबंधात दिलेला डाटा चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही. त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे देशाचा डाटा हा विश्‍वनीय आहे याची खात्री जगाला पटवून देण्याची गरज आहे असेही त्यांनी म्हटले आहे. आपल्या आकडेवारीच्या पद्धतीतील दोष दूर करून त्याचाहीं नीट आढावा घेणे अत्यंत आवश्‍यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पाश्‍चिमात्य देशातही बेरोजगारीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे त्याचे पडसाद भारतात उमटणे स्वाभाविक आहे पण त्याकडे दुर्लक्ष होणे परवडणारे नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे असे राजन म्हणाले. पीएफ अकौंट वाढले म्हणजे रोजगार वाढले असे मानून आपल्याला आत्मसंतुष्ट राहता येणार नाही. रोजगार निर्मीतीचे आकडे मोजण्यासाठी अधिक सुधारीत पद्धत आपल्याला अवलंबावी लागेल असेही ते म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)