देहूरोड, (वार्ताहर) – डेंग्युच्या आजाराने देहूरोड येथील एका चव्वेचाळीस वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. डेंग्यू व डेंग्यू सदृश्य रुग्ण वाढत असताना बोर्ड प्रशासनाकडून कोणतीही धूर फवारणी, औषध फवारणीची दक्षता घेतली जात नसल्याचे तसेच शहरवासींयांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शहरवासी करीत आहे.
देहूरोड आंबेडकर रोड येथे वास्तव्यास असणारा प्रभाकर गोविंद रोकडे याला थंडी ताप येत होता. मात्र त्याने उशीरा रविवारी ( दि.११ ) दुपारी रुग्णालयात धाव घेतली .त्यावेळी त्याचे पेशी फक्त १४ हजार तर रक्तचाप हा कमी असल्याचे डॉक्टरांना दिसून आल्यानंतर त्यावर तातडीने उपचार सुरू केले.
मात्र उपचारा दरम्यान सोमवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी ,पत्नी असा परिवार आहे. त्यांची पत्नी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये आशा कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.