मुंबई – बॉलिवूडमध्ये अनेक ऑलराऊंडर कलाकार आहेत जे कि चित्रपटामध्ये एकावेळेस अनेक भूमिका पार पडताना दिसतात. म्हणजे अनेकदा एकाच व्यक्ती कथा लिहितो,दिग्दर्शन करतो आणि एडिटिंगही एखादा छोटा रोलही करतो. बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील आता अभिनयाव्यतिरिक्त चित्रपटासाठी म्युजिक कंपोजिंग केल्याचे समोर आले आहे.
सनी देओलच्या ‘चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते, कारण या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरने प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच थरार निर्माण केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर बाल्की यांनी केले आहे.विशेष म्हणजे या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांनी म्युजिक कम्पोजर पुन्हा काम पाहिल्याचे समोर आले आहे.
चूप या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटातून अमिताभ बच्चन कम्पोजर झाले आहेत. होय, हे खरे आहे. आर बाल्की यांनी त्यांच्या एका मुलाखतीत याचा उल्लेख केला होता. त्यांनी सांगितले की त्यांनी चित्रपटाची कथा अमिताभ यांना सांगितली, त्यानंतर त्यांनी पियानोवर एक धून वाजवली. आर बाल्की यांना ही धून आवडली आणि त्यांनी अमिताभ यांना विचारले की ते त्यांच्या चित्रपटात वापरू शकतात का? आणि अमिताभ बच्चन यांनी होकार दिला. याव्यतिरिक्त या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच आणखी काही योगदान असणार का हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल.