पणजी – गोवा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सुवर्ण (50 वा वर्धापन दिन) महोत्सवामध्ये सुपरस्टार रजनीकांत यांना आइकॉन ऑफ दि गोल्डन जुबली आईएफएफआई 2019 ने गौरविण्यात येणार आहे. याबाबत माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घोषणा केली आहे.
Union Minister Prakash Javadekar: Veteran actor Rajinikanth (in pic 2-file pic) to be conferred with ‘Icon of Golden Jubilee IFFI 2019’ award at 50th International Film Festival of India (IFFI) in Goa pic.twitter.com/XAzIdgqaTK
— ANI (@ANI) November 2, 2019
यंदा या सोहळ्यासाठी रशिया हा भारताशी संलग्नित देश असणार आहे. सिनेसृष्टीतील मानाचा पुरस्कार सोहळा मानल्या जाणाऱ्या या आतंरराष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात यंदा विविध देशातील २०० चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. तसेच २६ विविध भारतीय भाषेतील चित्रपटही दाखवण्यात येणार आहेत.
दरम्यान, या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ५० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले १२ भाषेतील चित्रपटही या सोहळ्यात दाखवण्यात येणार आहेत. यावेळी महानायक अमिताभ बच्चन यांना अलिकडेच दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या ७ ते ८ चित्रपटांचे स्क्रिनिंग या सोहळ्यात होणार आहे.