व्हॉट्‌स ऍपचे ‘ग्रुप’ फीचरपासून वाचायचे आहे तर मग हे वाचा….

मुंबई : व्हॉट्‌स ऍपचे ‘ग्रुप’ हे फीचर अनेकांची डोकेदुखी बनत चालली आहे. अनेकदा युजर्सचे मत विचारात घेण्याआधी त्यांना व्हॉट्‌स ऍपवरच्या विविध ग्रुप्समध्ये ऍड केले जाते. नको असलेल्या ग्रुपमध्ये स्वत:चा नंबर ऍड होण्यापासून वाचायचे असल्यास कंपनीने नवा पर्याय युजर्सना उपलब्ध करून दिला आहे.

व्हॉट्‌स ऍपने आपल्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. या फीचरमुळे युजर्सना त्यांच्या मनाविरुद्ध कोणीही व्हॉट्‌स ऍप ग्रुपमध्ये ऍड करू शकत नाही. यासाठी युजर्सनां त्यांच्या व्हॉट्‌स ऍपमधील सेटिंगमध्ये काही बदल करावे लागतील. हे बदल केल्यानंतर नको असलेल्या व्हॉट्‌स ऍप ग्रुपमध्ये ऍड होण्यापासून तुम्ही वाचू शकता. हे बदल कसे करावे ते पाहू

* व्हॉट्‌स ऍप सुरु केल्यानंतर Settings या पर्यायावर क्‍लिक करा.
* त्यानंतर Account वर क्‍लिक करा.
* Account वर क्‍लिक केल्यानंतर Privacy हा पर्याय दिसेल.
* Privacy क्‍लिक केल्यानंतर Groups हा पर्याय दिसेल त्यावर क्‍लिक करुन तुम्ही सेटिंगमध्ये काही बदल करु शकता.
* Groups वर क्‍लिक केल्यानंतर Everyone, My Contacts आणि My Contacts expect असे पर्याय दिसतील.
* Everyone हा पर्याय निवडल्यावर तुम्हाला कोणीही, कोणत्याही व्हॉट्‌स ऍप ग्रुपमध्ये ऍड करु शकतं.
* ‘My Contacts या पर्यायावर क्‍लिक केल्यास तुमच्या Contacts list मधील युजर्सच तुम्हाला व्हॉट्‌स ऍप ग्रुपमध्ये ऍड करु शकतील.
* तर My Contacts expect या पर्यायावर क्‍लिक केल्यास तुमच्या Contacts list मधील वगळलेले युजर्स तुम्हाला कधीही नको असलेल्या ग्रुपमध्ये ऍड करु शकत नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.