हिमोग्लोबिन वाढवायचं तर आज पासून व्हिटॅमिन बी ६ घ्या…

ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त हिमोग्लोबिन घटल्यास शरीरातील रक्‍ताचं प्रमाण कमी होतं. मग उलट्या होणं, त्वचाविकार, उदासीनता यांसारख्या शारीरिक-मानसिक त्रासांना आयतंच आमंत्रण मिळतं. अशा वेळी ब-6 जीवनसत्त्वयुक्‍त आहाराचा उपयोग होतो. त्याने हिमोग्लोबिनचं प्रमाण सुधारतं. प्रत्येक व्यक्‍तीला साधारण दोन मिलीग्रॅम इतकी ब-6 या जीवनसत्त्वाची गरज असते.

या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी घटते. शरीराची वाढ खुंटते. त्वचाविकार यांसारख्या समस्या उद्‌भवतात. हाता-पायांतील शक्‍तीही कमी होते. हात-पायही भरपूर दुखतात. यकृतात स्निग्ध पदार्थ जमून त्याचं कार्य मंदावतं. त्यामुळे मेद आणि प्रथिनांचं शोषण नीट होत नाही. यकृताचं कार्य मंदावल्यामुळे पोट बिघडतं. हिमोसिडरॉसिस नावाचा विकार होतो. या विकारात यकृत आणि पानथरीत (स्प्लीन) लोहाचे क्षार जमू लागून तिथल्या पेशी नष्ट होतात. अस्थिमज्जेस (हाडांमधला मगज, बोनमॅरो) इजा होते. प्रतिकारशक्‍ती घटते.

लहान मुलांमध्ये ब-6 जीवनसत्त्वांचं घटल्यास त्यांना सारख्या फिट्‌स येतात. कधी कधी क्षयाच्या रुग्णांनाही या जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा त्रास होतो. क्षयाच्या आजारात ऍलोपॅथीत आयसोनिकोटिनिक ऍसिड हायड्रॉझाईड नावाचं औषध देतात. यामुळे ब-6 जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होते. यीस्ट या पदार्थात ब-6 हे जीवनसत्त्व भरपूर आढळतं. तसंच विविध प्रकारच्या बिया, अंकुरीत धान्यं आणि हिरव्या भाज्यांतही याचा भरपूर साठा असतो.
यात असतं ब-6 जीवनसत्त्व

फळं :
केळी, संत्री, सफरचंद, स्ट्रॉबेरी, पपनस, बेदाणा, जरदाळू आणि आक्रोड.
रसाहार, पेयं आणि सरबतं :गाजर, कोबी, काकवी, दूध आणि दुधाचे पदार्थ, संत्री, टोमॅटो, पालक आणि शेळीचं दूध.
सूप आणि भाज्या :
फुलकोबी, टोमॅटो, कांदा, बीट, कोबी, अळंबी, पालक, लेटयूस, अल्फा अल्फा, मक्‍याचं दूध.

कोशिंबिरी :
फुलकोबी, बीट, कांदा, टोमॅटो.
चटण्या आणि लोणची :
यीस्ट, मिरी, गहू बीज तेल, बटाटा, कांदा, टोमॅटो.

तेल :
भाततूस तेल, सोयाबीन तेल आणि मक्‍याचं तेल. ही तेलं फक्त गाळलेलीच हवीत म्हणजे फिल्टर्ड रिफाईंड, हायड्रोजनेटेड अजिबात नको.
कच्चे, शिजवून, भाजून आणि उकडून खाण्यायोग्य पदार्थ :
फुलकोबी, शेंगदाणे, बटाटे, फरसबीचे दाणे, डाळी, सालपटांसह धान्यं, ओट्‌स (एकप्रकारचं गव्हासारखं धान्यं), वाटाणा, तांदूळ, गहू, घरगुती चीज, मका.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.