होम आयसोलेशन व्हायचे असेल, तर ‘हे’ अॅप डाऊनलोड करावेच लागणार

पुणे – करोनाचा संसर्ग झाल्यानंतर सौम्य लक्षणे असतील आणि होम आयसोलेट व्हायचे असेल, तर महापालिकेने तयार केलेला “पीएमसी होम आयसोलेशन अँड्रॉइड ऍप’ डाऊनलोड करावेच लागणार आहे. यामुळे रुग्ण घराबाहेर पडल्यावर ऍपद्वारे लगेचच त्याची माहिती महापालिकेला मिळणार आहे.

करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आणि त्याला सौम्य लक्षणे असतील तर त्याला होम क्वारंटाइन केले जात आहे. मात्र, त्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये जाऊन तसा अर्ज भरून द्यावा लागतो. होम क्वारंटाइन कालावधी 17 दिवसांचा असल्याने त्या काळात या ऍपवरून बाधिताचे लोकेशन समजणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून होम आयसोलेशनचा पर्याय निवडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र, त्यानंतर आपल्याला काही लक्षणे नाहीत, आपल्याला कोणी विचारणारे नाही अशा अविर्भावात अनेक रुग्ण बाहेर फिरत आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवणारी कोणतीही सक्षम यंत्रणा महापालिकेकडे नाही. तितके मनुष्यबळही नाही. त्यामुळे अशांना “कंट्रोल’ करणे अवघड आहे. त्यामुळे हा ऍपचा पर्याय महापालिकेने काढला आहे.

…तर प्राधान्याने बेड मिळणार
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सौम्य लक्षणे असलेला एखादा रुग्ण होम क्वारंटाइन असेल आणि त्याने ऍप डाऊनलोड करून त्यात रजिस्ट्रेशन केले असेल, आणि त्याची लक्षणे तीव्र होऊन त्याला रुग्णालयात दाखल करण्याचे वेळ आली तर त्याला प्राधान्याने बेड मिळण्याची सुविधा केली जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.