…तर मोदींनाच काम मागा – कुमारस्वामी

बंगळुरू – रोजगाराबाबत जाब विचारणाऱ्या आंदोलकांना कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी कारेगुड्डा गावाकडे एका निवासी कार्यक्रमासाठी निघाले होते. दरम्यान त्यांची बस रायचूर येथे पोहोचल्यानंतर तेथील येरमारुस थर्मल पॉवर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला आणि घोषणाबाजीला सुरुवात केली. वेतन आणि इतर प्रश्नांसंदर्भात ते आंदोलन करीत होते.

आंदोलना दरम्यान आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या बससमोर शेम, शेम अशी घोषणाबाजी केली तसेच रोजगारांसंदर्भात त्यांना जाब विचारला. आंदोलकांच्या या पवित्र्यानंतर मुख्यमंत्री चिडले आणि त्यांनी बसच्या खिडकीतून आंदोलकांवर ओरडायला सुरुवात केली. त्यानंतर ते आंदोलकांना म्हणाले, “तुम्ही नरेंद्र मोदींना मत दिलं आहे तर त्यांनाच जॉबचं विचारा, मला काय विचारता?’ मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरावर क्षणभर आंदोलकही आवाक झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.