लॉकडाऊन नंतर स्मार्ट व डॅशिंग दिसायचं तर, ‘हे’ नक्की ट्राय करा

प्रत्येक पुरुषाला हॅण्डसम लूक देतील

पुणे – आता हळूहळू गोडगुलाबी थंडी जाऊन उन्हाळा सुरु झाला असून, गरमीचं वातावरण वाढत चाललं आहे. दरम्यान, उन्हाळ्यापासून सुरक्षेची तयारी कशी करून ठेवता येईल याकडे लक्ष देऊ या. उन्हळ्यात तुम्ही घराबाहेर पडता  त्यामुळे त्वचेवर अनेक परिणाम होऊन काळपटपणा (सनटॅन) येतो. तर आज आम्ही तुम्हाला या सनटॅन पासून वाचण्यासाठी काही खास टिप्स देणार आहोत…

लॉकडाऊनमध्ये घरच्याघरी या टिप्स वापरून स्वतःची त्वचा चांगली ठेवू शकता. यासाठी तुम्हाला काहीही खर्च करावा लागणार नाही.

बेसन पीठ –

बेसन पीठ त्वचेसाठी अतिशय नेहमीच फायदेशीर ठरते. बेसनात दूध, हळद, मध घालून हे मिश्रण एकत्र करा. हे मिश्रण एकत्र करून त्वचेवर लावा. 5 मिनिटांनंतर हे मिश्रण लावून मसाज करा. 15 ते 20 मिनिटांनंतर सुकल्यानंतर हे मिश्रण धुवून टाका. त्यानंतर तुम्हाला कमालीचे फ्रेश वाटेल.

मुलतानी माती – 

मुलतानी मातीचा उपयोग हा नैसर्गिक स्क्रब म्हणून करण्यात येऊ शकतो. तसेच त्वचेवरील व्हाईट आणि ब्लॅक हेड्‌स काढून टाकण्यासाठी फायदेशीर आहे. मुलतानी मातीमध्ये मॅग्नेशियम असतं जे चेहऱ्यावरील पिंपल्स काढून टाकण्यासाठी मदत करतं.

तसेच, अर्धा चमचा संत्र्याचा रस, त्यात 4 ते 4 थेंब लिंबाचा रस थोडी मुलतानी माती, अर्धा चमचा चंदन पावडर आणि थोडे गुलाबजल मिसळून थोडया वेळ फ्रिजमधे ठेवावे आणि नंतर चेह-याला लावा, 15 ते 20 मिनीटांनी पाण्याने चेहरे स्वच्छ धुवावा. हे मिश्रण देखील तुमच्या त्वचेवसाठी उत्तम काम करते.

 

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.