इंस्टाग्राम वापरता मग ‘या’ गोष्टी नक्की लक्षात घ्या!

नवी दिल्ली – सध्या तरुणांमध्ये इन्स्टाग्राम सर्वाधिक लोकप्रिय आहे. अनेकजण आपला बराच वेळ इन्स्टाग्रामवर घालवतात. इन्स्टाग्रामचे फॉलोवर्स, लाइक्स याबाबत युजर्सना उत्सुकता असते. अनेकदा तर फोटोंना अधिक लाइक्स मिळवण्यासाठी तरुणाईमध्ये चढाओढ सुरू असते. मात्र, आता या सर्व गोष्टींना आळा बसणार आहे.

इन्स्टाग्रामवर नवीन अकाऊंट सुरू करताना संबंधित युजरला त्याचे वय १३ वर्षे आहे हे स्पष्ट करावे लागणार आहे. वयाची १३ वर्ष पुर्ण असणाऱ्या युजर्संनाच आता इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू करता येईल. त्यापेक्षा कमी वय असेल तर इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू करता येणार नाही. इंस्टाग्रामने आपल्या एक ब्लॉगमध्ये या संदर्भात माहिती दिली आहे.

अनेकजण इंस्टाग्रामवर चुकीची आणि खोटी माहिती पसरवतात. तसेच, लहान मुलांचे देखील इंस्टाग्रामवर प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे हे इंस्टाग्रामसमोर एक प्रकारचे आव्हानच आहे. त्यासाठी इंस्टाग्रामने हे पाऊल उचले आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.