संक्रमित कुटुंबीयांशी वाईट वागाल तर…

पोलीस आयुक्‍तांच्या सूचना : सोसायट्यांसाठी नियमावली जाहीर

पुणे – करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे. त्या आधारे सोसायटीतील नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस आयुक्‍तांनी केले आहे. सर्व पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सोसायट्यांना याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शहरात करोना संसर्ग वाढत असतानाच सोसायट्यांमध्ये संक्रमण होत असल्याचे दिसून आले आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी ही मार्गदर्शिका जारी केली. त्यामध्ये प्रवेशद्वाराचे नियमन कसे करायचे, सोशल डिस्टन्सिंग कसे पाळायचे, जीवनाश्‍यक वस्तू विक्रेता, कामगार, कुरिअर पुरविणारे याबाबतीत पाळायचे नियम मार्गदर्शक नमूद केले आहेत. तसेच, संक्रमित रुग्ण व कुटुंबीयांशी दूरव्यवहार करू नये, असेही म्हटले आहे.

प्रवेशद्वाराचे नियमन
– सोसायटीत प्रवेश करताना मास्कचा वापर अनिवार्य, प्रवेशद्वार व लिफ्टजवळ वॉश बेसीन, हॅन्ड सॅनिटायझर स्टॅन्ड बसवावा
– लिफ्ट, स्वच्छतागृह, जिना सॅनिटायझर करावे.
– प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्‍तीची थर्मल मशीनद्वारे शरीराचे तापमान मोजण्यात यावे.
– ऑक्‍सिमीटर मशीनद्वारे तपासणी करून 95 पेक्षा पातळी कमी असल्यास संबंधित व्यक्‍तीची तत्काळ तपासणी करून घ्यावी.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन
सोसायटी परिसरात वावरताना दोन मीटर अंतर राखावे, गर्दी करू नये. परदेशातून किंवा इतर प्रांतातून आलेल्या व्यक्‍तीच्या संदर्भात विलगीकरणाच्या सूचनांची खात्री करून अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे. घरकाम करणारी व्यक्‍ती घरात येईल तेव्हा तिला एक कापडी बॅग व्यक्‍तीगत वस्तू ठेवण्यासाठी द्यावी. हात, तोंड, चेहरा साबणाने स्वच्छ धुवायला सांगा, या व्यक्‍तींना मास्क वापरणे अनिवार्य करावे.

जीवनावश्‍यक वस्तुविक्रेता, कामगार व कुरिअर यांचे नियमन
दूध, भाजीपाला, पेपर अन्य वस्तू विक्रेता, सफाई कर्मचारी, घरकाम करणाऱ्या महिला यांची प्रवेशद्वारावर दररोज स्क्रिनिंग टेस्ट व सॅनिटायझेशन नंतरच सोसायटीत प्रवेश द्यावा. घरकाम करणाऱ्या महिला, सुरक्षा रक्षक, वाहनचालाक प्रतिबंधित क्षेत्रात राहणारे नसावेत. पावसाळी दुरुस्ती व्यतिरिक्‍त इतर कोणतीही कामे करण्यास प्रतिबंध करावा. नवीन बांधकाम व नूतनीकरणाच्या कामास परवानगी देऊ नये.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.