Jitendra Tyagi | धर्मांतरानंतर वसीम रिझवीचे जितेंद्र त्यागी झालेल्या शिया वक्फ बोर्डाच्या माजी अध्यक्षांनी मुस्लिम धर्म सोडून सनातन धर्म स्वीकारणाऱ्यांना मोठी ऑफर दिली आहे. जितेंद्र त्यागी मुस्लीम समाजाला घर वापसीचे खुली आवाहन केले आहे.
तसेच धर्म परिवर्तन करून सनातन धर्म स्वीकारणाऱ्या मुस्लिमांना दर महिन्याला ३ हजार रुपये आणि उद्योगासाठीही मदत करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. मंगळवारी प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात संगमावर स्नान करण्यासाठी आले असताना त्यांनी ही घोषणा केली.
काय म्हणाले जितेंद्र त्यागी ?
“प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात संगमावर स्नान करून प्रचंड आनंद होत आहे. या पवित्र भूमीवरून देशभरातील मुस्लिमांना घरवापसीचा विचार करण्याचं आवाहन करतो. माझ्या मित्रांसोबत मिळून संस्था तयार करत आहे. या संस्थेकडून सनातन धर्म स्वीकारणाऱ्या मुस्लिम कुटुंबाला दर महिन्याला ३ हजार रुपये देण्यात येतील,” असे जितेंद्र त्यागी यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, “कुटुंब सनातन धर्मात जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत ही रक्कम दिली जाणार आहे. उद्योग करण्याची इच्छा असलेल्यांना उद्योगासाठी मदत करू. आपण कट्टरतावादी आणि जिहादी मानसिकतेतून बाहेर पडले पाहिजे. स्वतःच्या इच्छेने सनात धर्मात घरवापसी करा,”असे आवाहन जितेंद्र त्यागी यांनी केले आहे. Jitendra Tyagi |
जितेंद्र त्यागी हे पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी होते. उत्तर प्रदेशात शिया वक्फ बोर्डाचे ते माजी अध्यक्ष होते. मात्र ३ वर्षांपूर्वी इस्लाम सोडून त्यांनी सनातन धर्मात घरवापसी केली होती. त्यानंतर जुना आखाड्याचे महामंडलेश्वर नरसिंहानंद गिरी यांनी त्यांना जितेंद्र त्यागी नाव दिले. वसीम रिझवी यांनी सनातन धर्म स्वीकारल्यानंतर त्यांची शुद्धी करण्यात आली होती Jitendra Tyagi |
हेही वाचा:
‘… तर अमेरिका दिवाळखोर होईल’, मस्क यांच्या इशाऱ्याने डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली