“सिमी’वरील बंदी उठविल्यास तरुणांना जाळ्यात ओढतील

राज्य गुप्तवार्ता विभागाचा न्यायधिकरणापुढे दावा

पुणे – दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या सिमी संघटनेवरील बंदी यापुढील काळात ही कायम ठेवण्यात यावी. जर ही बंदी उठविण्यात आली, तर संघटनेमार्फेत तरुणांना जाळयात ओढून त्यांना भरती केले जाऊ शकते. तसेच, वेगवेगळ्या नावाने संघटना कार्यरत राहू शकते. बंदी असल्यामुळे संघटनेला राज्यभरात उघडपणे कोणतेही काम करता येत नसल्याची माहिती मुंबई एसआयडी(राज्य गुप्तवार्ता विभाग)चे पोलीस उपआयुक्त आणि सिमी केसेसचे नोडल अधिकारी निसार तांबोळी यांनी शनिवारी सिमी संघटनेवरील बंदीच्या अनुषंगाने गठित करण्यात आलेल्या बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) न्यायधिकरणाच्या न्यायाधीश मुक्ता गुप्ता यांचे समोर दिली.

यावेळी ऍडिशनल सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद उपस्थित होत्या. दरम्यान, आयोगाची पुण्यातील दोन दिवसाची सुनावणी संपली असून औरंगाबाद याठिकाणी दि.17 आणि 18 मे रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. तांबोळी यांनी न्यायधिकरणासमोर सांगितले, की “वेगवेगळ्या गुन्ह्यांत बंदी घालण्यात आलेल्या “सिमी’ संघटनेचे आरोपी सापडले असून अद्याप 21 आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात आले. आयोगासमोर आठ गुन्ह्यांचे प्रतिज्ञापत्र सादर करुन “सिमी’ची कशाप्रकारे भूमिका आहे आणि आरोपींच्या घरातून मिळालेले “सिमी’चे साहित्याची माहिती आयोगाला देण्यात आली.
मालेगाव येथील 2001च्या गुन्ह्यातील साक्षीदारांचे जबाबात आरोपींचे बंदी घालण्यात आलेल्या “सिमी’ संघटनेशी संबंध उघडकीस आले आहे.

मालेगाव येथील आझादनगर पोलीस स्टेशनचे 2009 च्या केसमध्ये आरोपींच्या घरझडतीत “सिमी’शी संबंधित पत्रके, रिसीट बुक, पॉकेट डायरी सापडली आहे. मालगेव येथील 2003च्या आयशानगर पोलीस स्टेशनचे गुन्ह्यात एका आरोपीच्या घरझडतीत “सिमी’चे पत्रके, भिंतपत्रिका सापडल्या. 2003 मध्ये नागपूर मधील सदर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात एका आरोपीने संगणकावरील सर्व माहिती डिलिट केल्याने त्याची नॉर्को चाचणी घेतली असता त्यात “सिमी’शी असलेले त्याचे संबंध उघडकीस आले. अकोल्यातील मूर्तिजापूर येथील 2009च्या केसमध्ये आरोपीचे ताब्यातून सीडी, पत्रके जप्त करण्यात आली असून जिहाद आणि सीमेवरील दहशतवादाची माहिती निष्पन्न झाली आहे.

दुसऱ्या नावाने कार्यरत राहून “सिमी’ संघटनेचे जाळे विस्तारित करण्याचा त्यामध्ये उल्लेख आहे. सोलापूर येथील विजापूरनाका पोलीस स्टेशनचे 2008 मधील गुन्ह्यात एका आरोपीला अटक करण्यात आली होती. नंतर त्यास भोपाळ येथील गुन्ह्यात हस्तांतरित करण्यात आले. कारागृहातून तो पळून गेल्यानंतर पोलीस गोळीबारीत त्याचा मृत्यू झाला. मात्र, त्याच्या घरातून “सिमी’चे साहित्य जप्त करण्यात आले. कल्याणमधील बाजारपेठ पोलीस स्टेशनचे 2007च्या दहशतवादी गुन्ह्यात आरोपींच्या ताब्यातून कॉम्प्यूटर फाईल्स, “सिमी’चे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. तर, भिवंडी येथील 2012 च्या गुन्हयात आरोपींकडून सीडी, सिमीचे प्रचार साहित्य जप्त केलेले आहे. शनिवारी पुण्यातील फरासखाना बॉम्बस्फोट प्रकरणातील सिमीचे संबंधाबाबतचे प्रतिज्ञापत्र न्यायधिकरणासमोर तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी सादर केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.