नवी दिल्ली – कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर आता राज्यात पुन्हा भाजप विरूद्ध काँग्रेस असा जोरदार संघर्ष होणार असलयाचे पाहायला मिळते. काँग्रेस मंत्री प्रियांक खर्गे यांनी नुकतच काही संघटनांवर बंदी बाबतचे वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे.
आरएसएस आणि बजरंग दलावरील बंदीच्या मुद्द्यावरून आज भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. मंत्री प्रियांक खर्गे यांच्या वक्तव्यावर कठोर टीका करताना कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, काँग्रेसने असे काही केले तर त्याचा परिणाम योग्य होणार नाही. तसेच काँग्रेस सुडाचे राजकारण करत असल्याचे देखील यावेळी बोम्मई म्हणाले.
बोम्मई म्हणाले,जेव्हा-जेव्हा कॉंग्रेसने आरएसएसवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा लोकांनी त्यांना घरी पाठवले. काँग्रेसने पुन्हा असे करण्याचा प्रयत्न करावा असं चॅलेंज देखील यावेळी बोम्मई यांनी दिले.तसेच भाजपच्या इतर मंत्र्यांनी देखील यावेळी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.
भाजप नेते अशोक म्हणाले की, एकेकाळी काँग्रेसचे संसदेत बहुमत होते आणि देशातील 15-20 राज्यांमध्ये सरकारे होती, मात्र अशा गोष्टींमुळे काँग्रेसची अवस्था वाईट झाली आहे. हिंमत असेल तर आरएसएसवर बंदी घाला, तुमचे सरकार तीन महिनेही टिकणार नाही.
काय म्हणाले होते प्रियांका खर्गे नेमकं
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी गुरुवारी म्हंटले होते की, त्यांचा पक्ष कर्नाटकमध्ये बजरंग दलावर बंदी घालण्यास तयार आहे. ते म्हणाले की, राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोणत्याही संघटनेवर बंदी घालण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही, मग ती आरएसएस असो वा बजरंग दल किंवा अन्य कोणतीही जातीयवादी संघटना असो.