…तर कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी उपचार सुरू करा

तज्ज्ञ डॉक्‍टरांचे मत

नवी दिल्ली ; करोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या मात्र त्याच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असेल आणि त्याच्यात करोनाची लक्षणे दिसत असतील तर त्याच्यावर उपचार करणे आवश्‍यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

करोनाची लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींचे तपासणी अहवाल अनेकदा निगेटिव्ह आले आहेत. वारंवार तपासणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे तीव्र लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना लक्षणे आणि सीटी स्कॅनच्या आधारे उपचार सुरू करावेत. आरटी-पीसीआर चाचणी योग्यतेचे प्रमाण केवळ 70 टक्के आहे. त्यामुळे त्यावर विसंबून राहता येणार नाही, असे सफदरजंग रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्‍टर नीरज गुप्ता यांनी सांगितले.

रॅपिड अँटिजेन चाचण्यातही योग्यता प्रमाण केवळ 40 टक्के च आहे. त्यामुळे या चाचण्यांवर विसंबून राहिल्यास अनेक जण उपचारापासून वंचित राहू शकतात, असे डॉ. गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे.
अँटीबॉडी टेस्टच्या योग्यतेचे प्रमाण 90 टक्के आहे. मात्र, त्याचा वापर करोना होऊन गेल्यानंतर करता येऊ शकतो. त्यामुळे त्या चाचणीचा उपचारासाठी लाभ होत नाही. त्यामुळे सौम्य लक्षणे असणाऱ्या, मध्यम लक्षणे असणाऱ्या आणि तीव्र किंवा अतितीव्र लक्षणे असणाऱ्या बाधितांच्या उपचाराबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली पाहिजे. टेस्टवर विसंबून न राहता लक्षणांवर आधारीत उपचार सुरू करणे करोना नियंत्रणासाठी आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.

करोनाचे प्रमूख लक्षण असलेला न्यमोनिया सीटी स्कॅनमध्ये दर्शवत असूनही आरटी-पीसीआर चाचणी अहवाल तीन – चार वेळा निगेटिव्ह आल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. काही वेळा शरीरातील अँटीबॉडीजची टेस्ट पॉझिटिव्ह येऊनही आरटी-पीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याचे प्रकार घडले आहेत, असे एम्सचे तज्ज्ञ डॉक्‍टर विजय गुर्जर यांनी सांगितले. ते म्हणअले, ज्येष्ठ नागरिक आणि बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींमध्ये लक्षणे दिसत असतील तर करोना बाधितांच्या धर्तीवर त्यांच्यावर उपचार आणि व्यवस्थअपन करणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.

अपोलो रुग्णालयाच्या डॉ. निखील मोदी यांच्या मते, नाकातून आणि घशातून स्राव घेण्याच्या अयोग्य प्रक्रियेमुळे अहवाल चुकीचा येऊ शकतो. त्याचबरोबर विषाणूंच्या संख्येचाही महत्वाचा भाग असतो. ती संख्या कमी असते त्यावेळी बाधित असूनही चाचणी अहवाल निगेटिव्ह येऊ शकतो. त्यामुळे लक्षणे असतील आणि अहवाल निगेटिव्ह येत असेल तर सीटी स्कॅनच्या आधारे योग्य अनुमान काढता येऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.