Prakash Raj On PM Modi| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. महात्मा गांधींना कुणीही ओळखत नव्हते. त्यांच्यावर चित्रपट आला आणि जगात त्यांची ओळख निर्माण झाली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. यावर राहुल गांधींनी एक व्हिडिओ शेअर मोदींना प्रत्युत्तर दिले. यावरून अभिनेता प्रकाश राज यांनीही एक व्हिडीओ शेअर करत नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
प्रकाश राज यांनी महात्मा गांधींसंदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सोबटच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ” पंतप्रधान नरेंद्र मोदी सर, हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही जर शाळेत गेला असतात तर तुम्हाला महात्मा गांधींबाबत समजलं असतं. कृपया व्हॉट्स अॅप युनिव्हर्सिटीतून बाहेर पडून थोडा अभ्यास करा.” Prakash Raj On PM Modi|
व्हिडिओत काय आहे?
महात्मा गांधी जेव्हा पॅरीसला गेले तेव्हा त्यांचे विचार ऐकण्यासाठी तिथे गर्दी झाली होती. महात्मा गांधी अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली या देशांमध्येही गेले होते. ही सगळी माहिती देणारा हा व्हिडीओ आहे. तसेच महात्मा गांधींची हत्या झाली तेव्हा जगभरात बातम्या आल्या होत्या असंही या व्हिडीओत सांगण्यात आले आहे.
Mr Prime minister @narendramodi this is for you sirji … if you had gone to a school you would have known our Mahathma .. please grow above your Whatsup University.. #justasking pic.twitter.com/zIwIXBFdtm
— Prakash Raj (@prakashraaj) May 29, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधींबाबत काय म्हणाले?
“महात्मा गांधी एक मोठं व्यक्तिमत्त्व होतं. आपण जगभरात त्यांची ओळख निर्माण करायला हवी होती. ही आपली जबाबदारी होती. मात्र, आपण त्यात अपयशी ठरलो. त्यांना कोणी ओळखत नव्हते. ज्यावेळी महात्मा गांधींवर पहिल्यांदा चित्रपट बनला तेव्हा जगभरात गांधी कोण होते? याबाबत कुतूहल निर्माण झाले . त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आपण ७५ वर्षात काहीही केले नाही.” Prakash Raj On PM Modi|
“जगभरात जर मार्टिन ल्यूथर किंग आणि नेल्सन मंडेलांना ओळखलंले. मात्र, गांधी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते. मी संपूर्ण जग फिरलो आहे. मात्र, गांधींना किंवा गांधींच्या माध्यमातून भारताला जी ओळख मिळायला हवी होती, ती मिळाली नाही,” असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते.
हेही वाचा:
Pune: प्रदेश काँग्रेसच्या दुष्काळ आढावा समितीची २ जूनला कराड येथे होणार बैठक