लाहोर : जगातील प्रत्येक देशात असे अनेक विचित्र कायदे आहेत ज्यामुळे लोकांच्या भुवया उंचावतात. आपला शेजारी देश पाकिस्तानमध्येही असेच काही विचित्र कायदे आहेत. या बाबतीत हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. अशा कायद्यांमुळे पाकिस्तानवर जगभरातून टीकाही होत आहे. येथील एका कायद्यानुसार तुम्ही जर लग्नापूर्वी तुमच्या मैत्रिणीसोबत किंवा प्रेयसीसोबत फिरताना पकडले गेलात तर तुम्हाला थेट तुरुंगात डांबले जाईल ! पाकिस्तानातील अशाच अजब कायद्यांविषयी जाणून घेऊया.
* 18 वर्षे पूर्ण झाल्यावर लोकांचे लग्न सक्तीचे करण्याचे विधेयक
काही महिन्यांपूर्वीच येथील एका कायद्यावर बरीच टीका झाली होती. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एक विचित्र विधेयक मांडण्यात आले. हे विधेयक शेजारील देशात तसेच जगभरात चर्चेचा विषय बनले होते. या विधेयकात 18 वर्षे पूर्ण झाल्यावर लोकांचे लग्न सक्तीचे करण्यात यावे, असे म्हटले होते. याशिवाय या कायद्याचे पालन न करणाऱ्यांना शिक्षेचीही तरतूद आहे. पाकिस्तानी राजकारण्यांचा असा युक्तिवाद आहे की यामुळे सामाजिक दुष्कृत्ये आणि बाल बलात्कार रोखण्यास मदत होईल.
* परवानगीशिवाय फोनला स्पर्श करू शकत नाही
परवानगीशिवाय एखाद्याच्या फोनला स्पर्श करणे पाकिस्तानमध्ये बेकायदेशीर मानले जाते. चुकूनही दुसऱ्याच्या फोनला कोणी हात लावला तर शिक्षेची तरतूद आहे. असे करणाऱ्याला ६ महिने तुरुंगवास होऊ शकतो.
* इंग्रजी भाषांतर बेकायदेशीर आहे
पाकिस्तानमध्ये तुम्ही काही शब्दांचे इंग्रजीत भाषांतर करू शकत नाही. या शब्दांचे इंग्रजीत भाषांतर करणे बेकायदेशीर मानले जाते. हे शब्द अल्लाह, मस्जिद, रसूल किंवा नबी आहेत. जर कोणी त्यांचे इंग्रजीत भाषांतर केले तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते.
* शिक्षण शुल्कावर कर आकारला जातो
पाकिस्तानमध्ये शिकण्यासाठी तुम्हाला कर भरावा लागेल. जर एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यासावर 2 लाखांपेक्षा जास्त खर्च केला तर त्याला 5% कर भरावा लागेल. कदाचित याच भीतीपोटी पाकिस्तानातील लोक कमी अभ्यास करतात.
* मैत्रिणीसोबत फिरताना पकडल्यास तुरुंगवास
जर एखादा मुलगा प्रेयसीसोबत राहत असताना अथवा फिरत असताना पकडला गेला तर त्याला तुरुंगवासाची शिक्षा होते. इथल्या मुलीशी कोणी मैत्री करू शकत नाही. लग्नापूर्वी मुलगा आणि मुलगी एकत्र फिरू शकत नाही असा कायदा शेजारच्या देशात आहे.