Ajit Pawar | विधानसभा निवडणुकीसाठी आता राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. मात्र या सभांद्वारे राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. अनेकदा एकमेकांवर वैयक्तिक टीका देखील केली जाते. बुधवारी महायुतीच्या सभेत जतमध्ये सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगावरून निशाणा साधला. ज्यामुळे आता खोत यांच्यावर संताप व्यक्त केला जात आहे.
सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या आजारपणावरुन केलेल्या वक्तव्याचे महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत. शरद पवार यांचे पुतणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही हे वक्तव्य रुचलं नसून त्यांनी सदाभाऊ खोत यांनी केलेल्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अजित पवार यांनी एक पोस्ट शेअर करत सदाभाऊ खोत यांना सुनावले आहे.
“ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे आणि निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 6, 2024
सदाभाऊ खोत काय म्हणाले होते?
जतमधील महायुतीच्या सभेत बोलताना रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप आमदार सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. शरद पवार यांच्यावर टीका करताना खोत म्हणाले, “शरद पवार आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी बँका हाणल्या, कारखाने हाणले, तरी भागले नाही. तरीही भाषणांमधून महाराष्ट्र बदलायचा असे सांगत फिरतोय. तुला तुझ्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र करायचा आहे का?” अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत खोत यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
हेही वाचा: