आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. म्हणजे आधार शिवाय कोणतेही काम पूर्ण होऊ शकत नाही. बँक खाते उघडण्यासाठी, सिमकार्ड घेण्यासाठी, कोणत्याही सरकारी सुविधेचा लाभ घेण्यासाठी, आपली ओळख उघड करण्यासाठी इ. तर अशी अनेक कामे केवळ आधारकार्डच्या माध्यमातून केली जातात. हे कार्ड युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केले जाते. ज्यामध्ये 12 अंकाचा एक विशिष्ठ क्रमांक समाविष्ट आहे.
भारतीयांसाठी महत्वाचे असलेले आधार कार्ड जर हरवले तर अशावेळी अनेकांचा गोधंळ उडतो. आधार हरविल्यानंतर आधार नोंदणी क्रमांकाच्या मदतीने ते पुन्हा मिळवता येते मात्र ज्यांच्याकडे आधार नोंदणी क्रमांकही नाही. अशा परिस्थितीत त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जर आधार नोंदणी क्रमांक नसेल तर अशावेळी काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. अशावेळी जर आधार नोंदणी क्रमांक मिळवायचा असल्यास तो तुम्ही घर बसल्या काही मिनिटांत मिळवू शकता.
अशी आहे प्रक्रिया
*सर्वप्रथम resident.uidai.gov.in या वेबसाइटला भेट द्या, ही UIDAI ची अधिकृत वेबसाइट आहे.
*My Aadhar पर्यायावर क्लिक करा
*यानंतर, आधार सर्विस सेक्शन मध्ये जावे लागेल, आणि तेथे, Retrieve lost (हरवलेला) किंवा Forgotten EID (विसरलेला EID) किंवा UID वर क्लिक करा.
*यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची काही महत्त्वाची माहिती विचारली जाईल. जो तुम्हाला येथे भरायची आहे.
*नंतर Send OTP च्या पर्यायावर क्लिक करा.
*यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल (आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर) OTP टाका आणि नंतर कॅप्चा कोड भरून लॉगिन करा.
*तुमचा आधार कार्डचा नोंदणी क्रमांक तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर येणार.
*जर तुमचा मोबाईल नंबर नोंदणीकृत नसेल, तर तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार केंद्रावर जाऊन तुम्हाला मोबाईल नंबर नोंदणी करून घ्यावा लागेल.