मुंबई – मोटार वाहन (दुरुस्ती) कायद्यांतर्गत वाहन परवान्याबाबत नवीन नियम लागू करण्यात आला आहे. यानुसार जर तुमचे वाहन परवाना एका वर्षापेक्षा अधिक कालबाह्य झाला तर तुम्हाला लर्नर टेस्ट (प्रशिक्षण परीक्षा) पुन्हा द्यावी लागणार आहे. म्हणेजच तुम्हाला पुन्हा एकदा लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करावा लागेल आणि नंतर कायम परवान्यासाठी 30 दिवस प्रतीक्षा करावी लागेल. तसेच कालबाह्य परवान्यासह वाहन चालविताना पकडले गेले असेल तर 500 रुपये दंड करण्याची तरतूद आहे.
नवीन नियमानुसार आपल्याला पुन्हा सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील. बायोमेट्रिक करावे लागेल आणि लर्निंग टेस्टदेखील द्यावी लागेल. एक आरटीओ प्रतिनिधी म्हणाले, नवीन नियमांबद्दल बरेच लोक अजूनही अनभिज्ञ आहेत. अशा परिस्थितीत आम्ही वाहन चालविणाऱ्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, आपल्या माहितीसाठी यूपीमध्ये पहिल्या परवान्याच्या नूतनीकरणासाठी जुन्या परवान्याची एक प्रत अर्जासोबत द्यावी लागत होती, परंतु आता अर्जदाराला ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागेल.