हेअर डाय करतांना अशी घ्या काळजी नाही तर…

वाढत्या वयाची लक्षणे वाढत्या वयासोबत्त प्रत्येकाच्या शरीरावर दिसू लागतात. केस पिकने अथवा पांढरे होणे त्यापैकीच एक! केस पांढरे झालेल्या प्रत्येकालाच पांढरे केस नको असतात. मग ते लपविण्यासाठी हेअर डाय किंवा  हेअर कलर्स करण्याचा विकल्प ते निवडतात. तुम्ही सुद्धा  नेहमीच हेअरस्टाइलवर नवनवीन प्रयोग करत असाल आणि त्यासाठी वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर करत असाल तर तुम्हाला कॅन्सरचा धोका अधिक पटीने वाढतो. म्हणून हेअरस्टाइलवर नवनवीन प्रयोग  करतांना काही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक असते.

हेअर डाय करतांना अशी घ्या काळजी

-हेअरडाय मध्ये केमिकल असल्याने तो वापरण्यापूर्वी कानामागे त्याची टेस्ट अवश्य घ्यावी.

-डाय केल्यानंतर केसांना कंडिशनिंग करणे गरजेचे आहे.

-हेअरडाय करताना पांढरे केस झाकणे हे कारण असेल तर रंग निवडताना आपल्या केसांच्या रंगाला मिळताजुळता रंग निवडावा.

– केसांचे छोटे छोटे भाग करून डाय लावावा, जेणेकरून सर्व ठिकाणी तो व्यवस्थित लागेल, यासाठी टेलकोम्बचा वापर करावा.

-घरात हेअरडाय लावताना हातात मोजे घालणे गरजेचे आहे.

-डाय हा शक्यतो डोक्यावरील त्वचेला लागणार नाही, याची काळजी घ्यावी. डाय लावल्यानंतर फक्त पाण्याने केस धुवावेत. दुसर्‍या दिवशी शॅम्पू करावा.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)