सत्तेत आल्यास नीती आयोग बरखास्त -राहुल गांधी

आयोगाकडून फक्‍त सरकारचे मार्केटिंग आणि आकड्यांमध्ये फेरफार

नवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. जर कॉंग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आल्यास नीती आयोग बरखास्त करण्यात येईल, असे त्यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. नीती आयोगाने मोदी सरकारचे मार्केटिंग आणि आकड्यांमध्ये फेरफार करण्याशिवाय काहीही काम केलेले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.

राहुल गांधी ट्विटमध्ये म्हणतात, सत्तेत परतल्यानंतर नीती आयोगाच्या जागी अत्यंत छोटा नियोजन आयोग आणण्यात येईल. या आयोगाचे सदस्य देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ आणि धोरणकर्ते लोकांचा समावेश करण्यात येईल. या आयोगात 100 पेक्षाही कमी लोकांचा भरणा असेल.

न्याय योजनेच्या घोषणेनंतर नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार यांनी या योजनेविरोधात मत प्रदर्शित केले होते. त्यांनी म्हटले होते की, जर अशा प्रकारची कोणती योजना लागू करण्यात आली तर त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर अत्यंत वाईट परिणाम होईल. राजीव कुमार यांच्या या विधानानंतर कॉंग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे त्यांच्याविरोधात तक्रार केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.