आरक्षण निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जायची भाषा करत असेल तर …

मुंबई – राज्य सरकारने आपल्या अधिकारात कायद्यात दुरूस्ती करून मराठा समजाला दिलेले आरक्षण हे वैध आहे. घटनात्मकदृष्ट्या 50 टक्के आरक्षण देण्याची मर्यादा असली तरी अपवादात्मक परिस्थितीत त्यात बदल करता येऊ शकतो, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट करताना राज्य सरकारला अशा प्रकारे बदल करून आरक्षण देण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा काल झाला.

पण या मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरोधात याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याची भाषा केली यावर काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी ट्विटद्वारे भाष्य केलं आहे. हायकोर्टाच्या निकालाच्या विरुद्ध कोण सुप्रीम कोर्टात जायची भाषा करत असेल..तर आम्ही तिथे ही लढण्यासाठी तयार आहोत असं नितेश राणे यांनी स्पष्ट केलं आहे.


नितेश राणे यांनी ट्विट केले आहे की, कोर्टाने मराठा आरक्षणाबाबत जो ऐतिहासिक निर्णय दिला. या लढ्याचा मी एक भाग होतो. या न्यायालयीन लढाईतही अंतिम निकालात माझं नाव याचिकाकर्ते म्हणून होतं त्याचा मला अभिमान आहे असही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.