नवी दिल्ली: नवी दिल्ली : कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप आटोक्यात आलेली नसताना तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. या घातक संसर्गाशी दोन हात करण्यासाठी विषाणूची साखळी तोडणं गरजेचं बनलं आहे. सोबत रुग्ण लवकर बरे होण्याचं प्रमाण वाढलं तर ती दिलासादायक बाब असेल. त्यासाठी भारत सरकारने गृह विलगीकरणात बरे होणाऱ्या रुग्णांसाठी नवा डाएट प्लॅन शेअर केला आहे. या डाएट प्लॅनमुळे रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती वाढून बरं होण्यास मदत होईल. डार्क चॉकलेट, खिचडी, मासे, पनीरचा आहारात नियमित समावेश केल्यास रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.
डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. तुमचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास घाबरून जाऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या. योग करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहार घ्या. त्यामुळे कोविडचा सामना करण्यास मदत मिळेल, असं हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.
स्ट्रेस कमी होतो याला आधार काय?
अगर आपकी #COVID19 की जांच रिपोर्ट Positive आई है तो बिल्कुल न घबराएं। डॉक्टर की सलाह से उपचार करवाएं ।
और हां, योग और प्रतिरक्षा शक्ति मजबूत बनाने वाली Diet ज़रूर लें। इससे आपको COVID19 से मुक़ाबला करने में बहुत मदद मिलेगी।@MoHFW_INDIA @PMOIndia #Unite2FightCorona pic.twitter.com/NBNTOGaopT
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) May 9, 2021
डार्क चॉकलेटमध्ये 70 टक्के कोको कंटेन्ट असतं. त्यामुळे कोरोनाच्या स्ट्रेसवर मात करता येते, म्हणून डार्क चॉकलेट खा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. हर्षवर्धन यांनी हा सल्ला दिल्यानंतर पुण्यात आणि भोपाळमध्ये संशोधन करणारे अनंत भान डार्क चॉकलेट खाल्ल्याने कोरोनाच्या स्ट्रेसवर मात करता येते याला आधार काय? असा सवाल केला आहे. डार्क चॉकलेट घेणं किती लोकांना परवडणार आहे?, असा सवालही भान यांनी केला आहे.
हर्षवर्धन यांनी डार्क चॉकलेटसह अन्य पदार्थांची यादीही दिली असून त्यातून इम्युनिटी पॉवर वाढत असून स्ट्रेसही कमी होत असल्याचे म्हटले आहे. नागरिकांनी शरीरात अधिकाधिक व्हिटॅमिन जाण्यासाठी भाजीपाला आणि फळांचं सेवन वाढवावं, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मांसपेशींमध्ये इम्युनिटी आणि एनर्जी लेव्हल वाढवणाऱ्या खाद्यपदार्थांचं सेवन करा. साबूत, ओट्स आणि अमरनाथचं सेवन करण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. प्रोटीनसाठी चिकन, मासे, अंडी, पनीर, सोया आणि नट्सचं सेवन करण्याचा सल्लाही आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. त्याशिवाय नियमित योग आणि प्राणायाम करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. तसेच तणावापासून दूर राहण्यासाठी 70 टक्के कोको असलेले डार्क चॉकलेटचंही सेवन करा. तसेच इम्युनिटी वाढवण्यासाठी हळदीयुक्त दूध प्या, असा सल्लाही देण्यात आला आहे.