नवी दिल्ली : हिंदी भाषा दिनानिमीत्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक देश एक भाषाचा नारा दिल्यानंतर देशात एकच वादळ उठले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा देशभरातील जनतेसह राजकीय नेत्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान, याचे तीव्र पडसाद हे दाक्षिणात्य भागात पडलेले दिसत आहेत. दक्षिणेतील राजकीय नेत्यांनी शहा यांच्या वक्तव्याच्या विरोधात आंदोलनाचे शस्त्र उपसण्याचा इशारा दिला आहे. मक्लल नीधी मैय्यमचे प्रमुख आणि अभिनेता कमल हासन यांनीदेखील अमित शहा यांच्या वक्तव्याला विरोध दर्शवला आहे. तसेच भाषेसाठी पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली तर आम्ही करू असे त्यांनी म्हटले आहे.
Now you are constrained to prove to us that India will continue to be a free country.
You must consult the people before you make a new law or a new scheme. pic.twitter.com/u0De38bzk0
— Kamal Haasan (@ikamalhaasan) September 16, 2019
अभिनेता कमल हासन यांनी अमित शहा यांच्या वक्तव्याचा विरोध करत असताना आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी अमित शहा यांचे नाव न घेता त्यांना उद्देशून आपले म्हणणे मांडले आहे. यात 1950 साली भारत देश विविधतेतून एकात्मतेच्या आधारावर तयार झाला आहे. त्यामुळे आता कोणाताही शाह किंवा सुलतान ही बाब नाकारू शकत नाही असे त्यांनी म्हटले आहे. तसेच कमल हासन यांनी, माझी भाषा तमिळ आहे आणि कायम तिच राहणार असल्याचे म्हणाले. अधिक आक्रमक होत त्यांनी अमित शहा यांच्या वक्तव्याचा विरोध करत भाषेसाठी पुन्हा एकदा आंदोलन करावे लागले तर आम्ही करू, मात्र यावेळचे आंदोलन हे जलीकट्टूपेक्षा अधिक तीव्र असेल असा इशारादेखील त्यांनी यावेळी दिला.