सत्तेत आलो तर आंध्र प्रदेशला ‘विशेष दर्जा’ देऊ- राहुल गांधी

नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी एका रॅलीमध्ये मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. तसेच यावेळी त्यांनी आंध्र प्रदेश राज्याला ‘विशेष दर्जा’ देण्याचे वचन दिले. जर २०१९ मध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर आले तर आंध्रप्रदेशला विशेष दर्जा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

ते पुढे म्हणाले “मला आंध्र प्रदेश आणि देशातील प्रत्येक व्यक्तीला सांगायचे आहे की दिल्लीमध्ये काँग्रेसची सत्ता येईल तेव्हा काँग्रेस पार्टीला आंध्रप्रदेशला ‘विशेष दर्जा’ देण्यापासून जगातील कोणतीही शक्ती थांबवू शकणार नाही.

आंध्र प्रदेशातील लोकांना ‘विशेष दर्जा’ देण्याचे आश्वासन दिले होते .आणि हे आश्वसन कोणत्याही सामान्य व्यक्तीने नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते.  राजकारणात आणि नेतृत्वातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीचे शब्द होय. जर तिचे वजन नसेल तर त्याचा अर्थ नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी यांनी भाषणात प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात 15 लाख रुपये दिले जातील, दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या आणि शेतकऱ्यांना योग्य हमीभाव, असे अनेक आश्वसन दिले होते. मात्र त्यांचे प्रत्येक विधान खोटे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.