…म्हणून बिडेन यांनी दुसऱ्या डिबेटला दिला नकार

वॉशिंग्टन – अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना झालेली करोनाची बाधा पूर्ण बरी झालेली नसेल तर त्यांच्याशी नियोजित असलेल्या दुसऱ्या थेट चर्चेत (डिबेट) मी सहभागी होऊ इच्छित नाही, असे डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवार जो बिडेन यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांना अजूनही करोना कायम असेल तर अशी चर्चा रद्द करणेच योग्य राहील असे त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. ट्रम्प आणि बिडेन यांच्यातील थेट चर्चेची दुसरी फेरी 15 ऑक्‍टोबरला आणि तिसरी फेरी 22 ऑक्‍टोबरला होणार आहे.

करोनाची स्थिती अत्यंत गंभीर असल्याने त्या विषयीच्या नियमांना आणि निर्बंधांना प्राधान्य असले पाहिजे अशी आपली भूमिका आहे, असे बिडेन यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे ट्रम्प यांनी मात्र आपण या चर्चेला उत्सुक असल्याचे म्हटले होते. मियामी येथे 15 ऑक्‍टोबरला होणाऱ्या चर्चेला आपण उत्सुक आहेत, ही एक चांगली संधी असेल, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार कमला हॅरिस आणि माईक पेन्स यांच्यात आज सॉल्ट लेक सिटीत जाहीर चर्चा होत आहे. अमेरिकेतील भारतीयही या चर्चेसाठी उत्सुक आहेत कारण त्यांच्यासाठी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना थेट चर्चेत सहभागी झालेले त्यांना पाहायचे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.