Prajakta Mali | अभिनेत्री प्राजक्ता माळीने ‘फुलवंती’ चित्रपटातील तिच्या अभिनय आणि नृत्याने सर्वांना घायाळ केले आहे. याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यादरम्यान आता सोशल मीडियावर प्राजक्ता माळीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तिने बंगळुरू आश्रमाला भेट दिली असून तेथील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ प्राजक्ता सांगते की, जर महाराष्ट्रावर आणि कलेवर प्रेम नसतं तर ती आता नक्कीच बंगळुरू आश्रमात आश्रमवासी असते.
प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितले की, “नमस्कार मंडळी! मी आता आर्ट ऑफ लिव्हिंग या बंगलुरु येथील आश्रमामध्ये आहे. थोड्याच वेळात सत्संग सुरू होणार आहे. त्याआधी मी ठरवलं की, मला तुम्हाला काय तरी सांगावं. जे मी खरंतर करतेय, ते खूपच भारी आहे. Prajakta Mali |
आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था प्राणायाम, ध्यान आणि योग शिकवते. यात अनेक बेसिक आणि अॅडव्हान्स कोर्स देखील आहे. चार महिन्यातून एकदा हा कोर्स करावा लागतो. मी हा कोर्स आश्रमात राहून पूर्ण केला. खरंतर लोकांना ध्यानधारणा करायची असते पण ते नक्की कसं करायचं हे माहित नसतं,” असं ती या व्हिडीओमध्ये म्हणते आहे. या व्हिडीओमार्फत तिने चाहत्यांना हा कोर्स करण्याचं आवाहनही केलं आहे. Prajakta Mali |
View this post on Instagram
आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर प्राजक्ता माळीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टला तिने हटके कॅप्शन देतलिहिलं की, “महाराष्ट्रावर आणि कलेवर इतकं प्रेम नसतं तर ह्या घडीला मी बंगळुरू आश्रमात आश्रमवासी असते. होय होय…इथे राहणं, ध्यान करणं इतकं मला आवडतं. आश्रमवासी नाही होऊ शकले तरी निदान १५-२० दिवस इथे सेवा करायला नक्कीच येईन. आणि सातत्याने इथे येत राहीन.” प्राजक्ताने शेअर केलेल्या या पोस्टला चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. Prajakta Mali |
हेही वाचा:
महायुतीचा शपथविधी सोहळा लांबणीवर? विधानसभेची मुदत संपल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू होणार?