#CWC19 : जर आजही पावसामुळं सामना पूर्ण झाला नाही तर..

मॅंचेस्टर – विश्‍वचषक स्पर्धेतील उपांत्य लढतीवर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. येथील हवामान खात्याने आजही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी (बुधवारी) या दोन्ही संघांचं भविष्य खऱ्या अर्थाने पावसाच्याच हातात आहे, असं म्हणायला हरकत नाही.

मंगळवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये झालेला सामना 46.1 व्या षटकात थांबवण्यात आला होता. ज्यावेळी न्यूझीलंडची धावसंख्या पाच गडी बाद 211 धावा इतकी होती. हाच सामना आज 3 वाजता पुन्हा सुरु होईल. मंगळवारी खेळ ज्या षटकात, ज्या चेंडूवर थांवण्यात आला होता, तेथूनच तो पुन्हा सुरु होणार आहे.

सामना पूर्ण होण्यासाठी भारतीय संघाला बुधवारी दिवशी 20 षटकांपर्यंत फलंदाजी करण्याची गरज आहे. जर असं झालं नाही आणि आजही खेळ झाला नाही तर भारत व न्यूझीलंड यांनी साखळी गटात केलेल्या कामगिरीचा निकष लावला जाईल. या गटात भारताने 15 गुण घेत आघाडीस्थान घेतले आहे. न्यूझीलंड 11 गुणांसह चौथ्यास्थानावर आहे. साहजिकचे गुणांच्या आधारे भारतास अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.