‘अगर जिंदगी मे कुछ पाना हो, तो तरिके बदलो इरादे नही’…

संजय राऊत यांचे राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे ट्‌विट

नवी दिल्ली: राज्यातला सत्ता स्थापनेचा तिढा केव्हा सुटणार हा आज घडीला सर्वांनाच पडलेला प्रश्‍न आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत दररोज नवनवीन ट्‌विट करत सूचक इशारा देत आहेत. आजही त्यांनी असेच एक ट्‌विट केले असून त्यातून त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे.

\
संजय राऊत यांनी आज केलेले हे ट्‌विट सत्तास्थापनेसाठी आहे का? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. आयुष्यात काही मिळवायचे असेल तर पद्धत बदलली पाहिजे पण लक्ष्य सोडले नाही पाहिजे असा आशयाचे ट्‌विट त्यांनी केले आहे. ‘अगर जिंदगी मे कुछ पाना हो, तो तरिके बदलो इरादे नही… जय महाराष्ट्र’ असे ट्‌विट संजय राऊतांनी केले आहे.

शिवसेनेने पहिल्यापासून मुख्यमंत्रीपदावर आपला दावा सांगत आहे. याच कारणामुळे भाजप शिवसेना युती तुटली. यानंतरही संजय राऊत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार हे सतत ते सांगत आले आहेत. शिवसेनेशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही. आता त्यांनी हे ट्‌विट करत पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)